फेब्रवारी महिन्यात सर्वसाधारण अर्थसंकल्प असतो. याबाबत प्रत्येक वर्गातील लोकांचे डोळे केंद्र सरकारकडे लागले आहे. विद्यार्थ्यांनीही कमी व्याजदरात शैक्षणिक कर्जाची मागणी चालू केली आहे. शिक्षण पूर्ण करून स्वस्त दरात शैक्षणिक कर्ज आणि रोजगाराची व्यवस्था करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी चालू केली आहे. रांची विद्यापीठाच्या इंस्टीट्यूट ऑफ मेनेजमेंट स्टडीजच्या विद्यार्थ्यासोबतच संस्थेच्या संचालकांनीही सर्वसाधारण अर्थसंकल्पावर आपले मत मांडले आहे.
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी. यासोबतच शिक्षणावरही भर देण्याची गरज आहे. दूसरीकडे,अर्थसंकल्पातही अशी तरतूद असावी,ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढू शकतील,असे मत विद्यार्थीनींचे आहे. याचा फायदा तरुण लोकांना होणार आहे.
या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठीही तरतूद असायला पाहीजे,असे मत विद्यार्थी अनूप मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे तरुण लोकांना रोजगाराचा मार्ग खुला होईल. अर्थसंकल्प असा असायला पाहीजे ज्याचा लाभ गरजू लोकांना मिळाला पाहिजे,असे मत अनूप कुमार यांचे आहे.विद्यार्थ्यांच्या वाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी कर्ज आवश्यक असल्याचे मेघा सिंगचे मत आहे. त्यामुळे या अर्थ संकल्पात स्वस्त शैक्षणिक कर्जाची तरतूद असवी.
अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रात भर देण्याची गरज असल्याचे मत विद्यार्थिनी शिवानी कुमारी यांनी व्यक्त केले आहे. जेणेकरून विद्यार्थ्याना अभ्यास करणे फार सोपे जाईल. करात सुट मिळावी असे मत सुजाता कुमारी यांचे आहे. जेणेकरून आमच्या घरातील लोकांना यापासून दिलासा मिळेल. हे आमच्या सोयीचे असेल. शैक्षणिक कर्जाचा भार पालकांवर वाढतो असे मत प्रिया कुमारीचे आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाचीसाठी वेगळी तरतूद असावी.
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .