राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे राज्य शासन – प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ सातत्याने प्रयत्न करीत आहे . या सदंर्भात मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अख्यक्षेखालील दि.19 सप्टेंबर 2022 रोजीच्या बैठकीत त्याचबरोबर मा. उपमुख्यमंत्री महोदयांशी दि.28 जुलै 2022 च्या समक्ष भेटी प्रसंगी अत्यंत सकारात्मक चर्चाविनिमय होवून देखिल दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शासनाच्या वेळकाढु धोरणामुळे राज्य भरातील अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे .
त्यास अनुषंगून ,अधिकारी महासंघाने दि.27.10.2022 च्या निवेदनान्वये प्रलंबित प्रश्नांवर दि.15.11.2022 पुर्वीच निर्णय व्हावेत , असा रास्त आग्रह शासन प्रशासनाकडे धरला आहे . दि. 15 नोव्हेंबर 2022 पूर्वी निर्णय न झाल्यास , दि. 16 नोव्हेंबर 2022 च्या नियोजित राज्य कार्यकारिणीत महासंघाकडुन आंदोलनात्मक कार्यवाहीविषयी निर्णय घेतला जाणार आहे . वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांबाबत शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून , सहाजिकच आंदोलनात्मक पवित्रा घेण्यासाठी महासंघावर दबाव वाढला आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना 38% DA वाढ बाबतचा महत्वपूर्ण आनंदाची बातमी !
यामुळे महासंघाची शासनाशी सोहार्द टिकवून प्रश्नांच्या सोडवणूकीकरीता मा. मुख्यमंत्री , मा. उपमुख्यमंत्री , मा.मुख्यसचिव त्याचबरोबर संबंधित सचिवांना देखिल अधिकारी महासंघाच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे .या संदर्भातील महासंघाकडुन निर्गमित करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026