महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग – क पदांच्या एकुण 22,208 जागांसाठी महाभरती राबविण्यात येणार आहे . जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील यामध्ये वाहनचालव व गट ड संवर्गातील पदे वगळुन रिक्त पदे भरणेबाबत ग्राम विकास विभागाचा दि.15.11.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे . जिल्हा परिषद भरती संदर्भातील ग्राम विकास विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग क संवर्गामध्ये सुमारे 25,000 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत . सदर जिल्हा परिषदांतील रिक्त पदांवर पदभरती करणेबाबत राज्य शासनाकडुन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे .यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक , लिपिक – टंकलेखन , आरेखन , भुमापक , प्रयोगशाळा सहाय्यक , शिक्षक , वरिष्ठ अधिकारी , कनिष्ठ लेखापाल , कनिष्ठ विस्तार अधिकारी इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत .यामध्ये ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट – क मधील सर्व संवर्गाची यामध्ये वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळण्यात आली आहेत .
सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे . सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि.15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागु असणार आहे . त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या दि.30 सप्टेंबर 2022 नुसार सुधारित आकृत्तीबंध शासनाने मान्य केल्यावर प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे .या भरती प्रक्रिया संदर्भातील संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत .
यामध्ये पदभरती प्रक्रिया बाबतची जाहीरात 1 ते 07 फेब्रुवारी 2023 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे .व दि.14 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे .तर परिक्षेचा अंतिम निकाल व नियुक्ती प्रक्रिया दि.01 ते 31 मे या कालावधीमध्ये पुर्ण करण्यात येणार आहे . भरती प्रक्रिया संदर्भातील ग्राम विकास विभागाचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करु शकता .
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..