MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट – ब  (अराजपत्रित) संवर्गातील विविध पदांच्या 480 जागेसाठी मोठी पदभरती ..

Spread the love

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट – ब संवर्गातील विविध पदांच्या 480 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Recruitment for various Class B Post , Number of Post Vacancy  -480 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहायक कक्ष अधिकारी55
02.राज्य कर निरीक्षक209
03.पोलिस उपनिरीक्षक216
 एकुण पदांची संख्या480

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : 19-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 14.10.2024 पासुन ते दि.04.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 719/- रुपये तर मागास / अनाथ / आ.दु.ध प्रवर्ग करीता 449/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment