जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 327 रिक्त पदावर पद भरती ; अर्ज करायला विसरू नका .

Spread the love

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 327 रिक्त पदावर मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zp thane Recruitment for various post, number of post vacancy – 327 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अहर्ता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहिरात पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यामध्ये वैद्यकीय अधिकारी , विशेषज्ञ अधिकारी , सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता-  सिव्हिल , दंत वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स , पर्यवेक्षक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ योग प्रशिक्षक , आहार तज्ञ,  समुपदेशक , अधिपरिचारिका मल्टी पर्पज वर्कर अशा विविध पदांच्या एकूण 327 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे .

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता खालील नमूद सविस्तर जाहिरात पहावी .

परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गाकरिता 300/- रुपये तर , राखीव प्रवर्ग करिता 200/-  रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया :  जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन  https://docs.google.com/forms/  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करायची आहेत . तर सदर  अर्जाची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद ठाणे, तळमजला रोड नंबर 22 जीएसटी भवन समोर , स्टेट बँकेजवळ वागळे इस्टेट ठाणे 400604 या पत्त्यावर सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment