विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नव विभागीय मंडळाच्या माध्यमातून फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे व दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसारच आता इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ही सहसा 21 फेब्रुवारीपासून 21 मार्च पर्यंतच्या कालावधीमध्ये होणार असून दहावीची लेखी परीक्षा दोन मार्चपासून ते पंचवीस मार्चच्या दरम्यान होईल. विद्यार्थी मित्रांनो हे इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांचे संभाव्य असे वेळापत्रक आहे.
विद्यार्थी मित्रांनो वेळापत्रकाबाबतच्या ज्या काही सूचना आहेत त्या 15 दिवसाच्या आत मंडळाला लेखी मागविण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर शिक्षकांकडून पालकांकडून आणि विविध संघटनांकडून असलेल्या सूचनांचा आढावा घेण्यात येणार आहे आणि दहावी बारावीचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे.
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026