स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्रीय वित्त विभाग अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक / बहुउद्देशिय कर्मचारी पदांकरीता सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रताधारक उमदेवारांनी विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे .पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात …
पदांचे नावे / पदसंख्या – कार्यालयीन सहाय्यक / मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेक्निकल ) व हवालदार यामध्ये MTS पदांचे एकुण 11,994 पदे आहेत तर हवालदार पदांची एकुण 529 जागा रिक्त आहेत असे एकुण 12,523 जागांसाठी मोठी मेगाभर्ती राबविण्यात येत आहेत .
पात्रता / वयोमर्यादा – मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार या दोन्ही पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराचे वय दि.01 जानेवारी 2023 रोजी MTS पदांकरीता 18 ते 25 वर्षादरम्याने असणे आवश्यक आहे .तर हवालदर पदांकरीता उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दि.24 फेब्रुवारी 2023 ( वेळ 11.00 pm ) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा .सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवाकडुन 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तसेच मागासवर्गीय उमेदवारांकरीता / महिला उमेदवारांकरीता कोणत्याही प्रकारची आवदेन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !