वित्त विभागामध्ये कार्यालय सहाय्यक पदांच्या 12,523 जागांसाठी मेगाभर्ती ! पात्रता केवळ 10 वी उत्तीर्ण !

Spread the love

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्रीय वित्त विभाग अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक / बहुउद्देशिय कर्मचारी पदांकरीता सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रताधारक उमदेवारांनी विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे .पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात …

पदांचे नावे / पदसंख्या  – कार्यालयीन सहाय्यक / मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेक्निकल ) व हवालदार यामध्ये MTS पदांचे एकुण 11,994 पदे आहेत तर हवालदार पदांची एकुण 529 जागा रिक्त आहेत असे एकुण 12,523 जागांसाठी मोठी मेगाभर्ती राबविण्यात येत आहेत .

पात्रता / वयोमर्यादा – मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार या दोन्ही पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराचे वय दि.01 जानेवारी 2023 रोजी MTS पदांकरीता 18 ते 25 वर्षादरम्याने असणे आवश्यक आहे .तर हवालदर पदांकरीता उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दि.24 फेब्रुवारी 2023 ( वेळ 11.00 pm ) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा .सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवाकडुन 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तसेच मागासवर्गीय उमेदवारांकरीता / महिला उमेदवारांकरीता कोणत्याही प्रकारची आवदेन शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment