बस महामंडळामध्ये तब्बल 13,830 जागेवर चालक – वाहक व लिपिक पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे . सध्या महामंडळामध्ये रिक्त पदांचा आकडा मंजूर पदापेक्षा अधिक झाल्याने , कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत आहे .
सध्या महामंडळाकडून रिक्त पदावर कंत्राटी पद्धतीने , भरती प्रक्रिया राबवली आहे . परंतु सदर रिक्त पदावर कायमस्वरूपी पद्धतीने भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे . याकरिता महामंडळाकडून सुधारित आकृतीबंध तयार करण्यात येत आहे . यामध्ये संवर्ग क मध्ये चालक -वाहक , कनिष्ठ लिपिक तसेच वाहतूक निरीक्षक या पदाकरिता मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे .
यामध्ये चालक व वाहक पदांच्या एकूण 8320 जागा रिक्त असून काही पदे वाढीव निर्माण करण्यात येणार आहे . सध्या राज्य शासनाकडून राज्यातील महिलांना 50 टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे . त्याचबरोबर 75 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना देखील तिकिटामध्ये 100% सवलत देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे .
यामुळे नागरिक प्रवासाकरिता महामंडळाच्या बसेसचा अधिक वापर करीत आहेत , म्हणुन रिक्त पदावर लवकरच भरती प्रक्रिया राबवणे महामंडळाला अत्यावश्यक आहे .त्याचबरोबर बस महामंडळामध्ये कोरोना महामारीनंतर कोणतीही पदभरती प्रक्रिया झालेली नसल्याने रिक्त पदांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026