राखीव पोलिस दलांमध्ये 9,212 पदांसाठी , दहावी पात्रता धारकांसाठी महाभरती 2023 ! Apply Now Online !

Spread the love

केंद्रीय राखीव पोलिस दल ही एक केंद्र सरकारची निमलष्करी दल असून , देशाच्या अंतर्गत सेवा व आवश्यकतेनुसार देश सेवेकरीता बोर्डर सुरक्षतेचे काम करत असते .या राखीव पोलिस दलांमध्ये इतर इतर सेवा करीता एकुण 9,212 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारक उमदेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात .

केंद्रीय राखीव पोलिस दलांमध्ये इतर सेवा यामध्ये वाहनचालक , मेकॅनिक , कॉब्लर , टेलर , ब्रास बँड , बगलर , माळी , पेंटर ,स्वयंपाकी , सफाईगार , वॉशरमन , वॉटर कॅरियर , हेयर ड्रेसर , बार्बर इत्यादी पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . यामध्ये पुरुष उमदेवारांकरीता एकुण 9,105 जागा असून महिला उमेदवारांकरीता एकुण 107 जागा आहेत .

पात्रता – सर्व पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातुन इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर वाहन चालक पदाकरीता वाहन चालविण्याचा परवाना , तर मेकॅनिक पदाकरीता आयटीआय मोटर व्हेईकल पात्रता असणे आवश्यक , इतर सर्व पदांकरीता उमेदवार हा फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

शारीरीक पात्रता –

उंची – पुरुष उमेदवाराची उंची 170 से.मी तर महिला उमेदवाराची उंची 157 से.मी असणे आवश्यक आहे तर अनुसुचित प्रवर्गातील पुरुष उमेदवारांकरीता 162 से.मी उंची असणे आवश्यक तर महिला उमेदवारांकरीता 150 से.मी उंची असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज https://crpf.gov.in/recruitment-details.htm?263/AdvertiseDetail या संकेतस्थळावर दि.25.04.2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवारांकडून 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक  व महिला उमेदवारांकरीता कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही . अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment