स्टाफ सिलेक्शन कमिशन इंडिया मध्ये , तब्बल 7,500 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , ऑनलाईन पद्धतीने दिनांक 07 मे 2023 पर्यंत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांची नावे , पात्रता इतर पद भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहुयात .
स्टाफ सिलेक्शन कमिशन , संयुक्त पदवीधर स्तर 2023 मार्फत तब्बल 7,500 पदांसाठी मेगा भरती राबविण्यात येत असून , यामध्ये सहाय्यक सांख्यिकी अधिकारी , सहाय्यक खाते अधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी , सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर , आयकर निरीक्षक , निरीक्षक सहाय्यक, इनफोर्समेंट अधिकारी , संशोधन अधिकारी , कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी , अन्वेक्षक अकाउंटंट , कनिष्ठ अकाउंटंट , पोस्ट सहाय्यक , लिपिक , कर सहाय्यक , उपनिरीक्षक इत्यादी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
यामध्ये कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी पदाकरिता उमेदवार हा पदवी उत्तीर्ण त्याचबरोबर इयत्ता बारावी मध्ये गणित विषयात 60 टक्के गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर उर्वरित सर्व पदांकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक आहे .
सदर पद भरती प्रक्रिया केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023 अंतर्गत पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदभरती प्रक्रियेसाठी आवश्यक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करायचा आहे . अर्ज सादर करण्यासाठी , त्याचबरोबर सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026