फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारासाठी सरकारी नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी आली असून , पात्र उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचे नाव , पदसंख्या याबाबत सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूयात ..
केंद्र शासन सेवेच्या केंद्रीय राखीव पोलीस (CRPF ) दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या तब्बल 9,212 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदांकरिता अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 15 एप्रिल 2023 अशी होती . परंतु केंद्र सरकारकडून अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून , दिनांक 02 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत .
यामध्ये वाहन चालक ,मोटर मेकॅनिकल व्हेईकल , कॉब्लर , कारपेंटर , टेलर , ब्रास बँड , पाईप बँड , बगलर , माळी , पेंटर, स्वयंपाकी ,वॉटर कॅरियर , वॉशरमॅन , बार्बर ,सफाई कर्मचारी , हेअर ड्रेसर ,अशा कॉन्स्टेबल (जवान ) पदांच्या एकूण 9,212 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .यामध्ये महिला उमेदवारांकरिता 107 जागा राखीव ठेवण्यात आलेले आहेत .
पात्रता : यामध्ये वाहन चालक पदाकरिता उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे . तर कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिकल व्हेईकल या पदाकरिता उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर आयटीआय मध्ये मोटार व्हेईकल या ट्रेडसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर उर्वरित सर्व पदांकरिता उमेदवार फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , व शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे .
वेतनश्रेणी : सातव्या वेतन आयोगानुसार निवड झालेल्या उमेदवारांना P लेबल 03 मध्ये 21,700 ते 69,100/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येईल , त्याचबरोबर इतर लागू असणारे वेतन व भत्ते अनुज्ञेय असतील .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026