महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये आताची नवीन पदभरती प्रक्रिया प्रसिद्ध झाली असून , पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने विहित कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहे . पदांचे नाव , पदसंख्या , आवश्यक पात्रता या संदर्भातील सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया .
पदनाम / पदसंख्या : यामध्ये विजतंत्री ( इलेक्ट्रिशियन ) पदांच्या 29 जागेसाठी तर तारतंत्री (वायरमन) या पदांच्या एकूण 20 जागेसाठी असे एकूण 50 पदांकरिता पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
पात्रता :- सदर पदांकरिता उमेदवार हा दहावी उत्तीर्ण (SSC) असणे आवश्यक आहे , तसेच तारतंत्री (वायरमन) / वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) ट्रेड मध्ये आयटीआय (ITI ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वेतनमान / मानधन : सदरची पदे ही प्रशिक्षणार्थी म्हणून भरण्यात येत असून , सदर पदांना प्रतिमहा 7,700/- ते 8050/-रुपये वेतन/ मानधन देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने या https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/ संकेतस्थळावर अर्ज सादर करायचा आहे . अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल , सदर पद भरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !