महाराष्ट्र राज्यातील विविध विभागांमध्ये संवर्ग ब , क व ड मधील रिक्त पदांच्या तब्बल 1 लाख 45 हजार पदांवर पदभरती प्रक्रिया होणार आहे . या संदर्भात मा. मुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये पदभरती प्रक्रियेबाबतचा सविस्तर आढावा घेण्यात आल्यास , राज्यातील विविध विभागांकडून रिक्त् पदांपैकी अत्यावश्यक असणारे पदांच्या 1 लाख 45 हजार पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्याची मागणी केलेली आहे .
यामुळे सदर पदभरती प्रक्रिया दोन टप्यात करण्यात येणार आहे , पहिल्या टप्यांमध्ये 75 हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल . ही पहिल्या टप्यातील पदभरती प्रक्रिया 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .तर उर्वरित पदांसाठी दुसऱ्या टप्यांमध्ये पदभरती घेण्यात येणार आहे .
हे पण वाचा : 12 वि पात्रता धारकांसाठी 1086 पदांसाठी मेगाभर्ती 2023
पदभरती प्रक्रियेचा सद्धस्थितीमधील अहवाल –
सध्या महाराष्ट्र राज्य शासन सेवेत सुमोर अडीच लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत , परंतु काही विभागांचा सुधारित आकृत्तीबंध अद्याप तयार झालेला नाही .सद्यस्थितीमधील आकडेवारी नुसार 75 हजार कोट्यातील महाभरती पैकी 6,499 पदांवर पदभरती घेण्यात आलेली आहे . तर 47 हजार पदांवर पदभरती करण्यासाठी नुकतेच TCS आणि IBPS कंपनीसोबत करार करण्यात आलेले आहेत .

आता पर्यंत गट ब , क व ड पदांच्या 9 हजार 775 पदांसाठी पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .यापैकी 2 हजार 811 पदांचा निकाल देखिल जाहीर करण्यात आलेला आहे .
येत्या काळांमध्ये राज्यातील काही विभागांमध्ये रिक्त् पदांवर पदभरती होणे आवश्यक असल्याने , सदर 1 लाख 45 हजार पदांवर पदभरती करण्याचा आग्रह प्रत्येक विभाग व मंत्र्याकडून करण्यात आला आहे . यामुळे राज्यातील सुशिक्षित असणाऱ्या बेरोजगार तरुणांना राज्य शासन सेवेत हक्काची नोकरी मिळणार आहे .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026