महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत गट क मधील तब्बल 18,939 रिक्त पदांवर सरळसेवा पद्धतीने मेगाभरती संदर्भात अखेर राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दि.15.05.2023 रोजी महत्वपुर्ण पदभरती प्रक्रिया शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यांमध्ये संवर्ग क मधील वाहनचालक हे पद वगळण्यात आलेले आहेत .
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील ( वाहनचालक व गड – ड संवर्गातील पदे वगळून ) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत . यानुसार सरळसेवेची रिक्त पदे भरणेबाबत , वेळापत्रक निश्चित करणेत आलेले होते . तसेच सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दि.21.11.2022 नुसार भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील ( महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) गट ब , गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व आय.बी.पी.एस या कंपनीमार्फत राबविणेच्या सुचना निर्गमित करणेत आल्या आहेत .
शैक्षणिक अर्हता / वयोमर्यादा – महाराष्ट्र शासनाचे विविध विभागांकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेले शासन निर्णय , अधिसूचना , परिपत्रक इत्यादीद्वारे निश्चित केलेली मर्यार्दाता व शैक्षणिक अर्हता नमुद केलेली आहे . त्याचबरोबर सद्यस्थितीत असलेली वयोमर्यादा दिनांक 03 मार्च 2023 चे शासन निर्णयानुसार दि.31 डिसेंबर 2023 पर्यंत कमाल वयोमर्यादेत खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे यांमध्ये दोन वर्षे इतकी शिथिलता खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे विचारात घेण्यात येणार आहेत .
त्याचबरोबर सदर पदभरती प्रक्रिया शासन निर्णयांमध्ये वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाची नमुना जाहीरात व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावयाची सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत .तसेच अनुसुचित क्षेत्रातील सरळसेवेची पदे , व बिगर अनुसूचित क्षेत्रातील पदे सरळसेवेने भरणेबाबत महत्वपुर्ण माहिती नमुद करण्यात आलेली आहे .
सदर जिल्हा निवड समिती मार्फत राबविणेत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेवर देखरेख व तपासणी करण्याचे अधिकार विभागीय आयुक्त यांचे असणार आहेत .या संदर्भातील पदभरती प्रक्रिया सविस्तर जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !