पुणे येथील भारतीय विमानतळ मध्ये सुरक्षा रक्षक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Air Airport Pune Recruitment for Security Guard ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती माहितीपुढीलप्रमाणे पाहुयात ..
सुरक्षा रक्षक या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा त्यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .सदरची पदभरती प्रक्रिया ही पर्मनंट पद्धतीने करण्यात येत असून विमानतळाचे रक्षण करणेकामी सदर पदे भरले जात आहेत .
सदरची पदभरती प्रक्रिया ही एएआय कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड द्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यांमध्ये सुरक्षा रक्षक / सुरक्षा स्कॅनर या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
निवड प्रक्रिया : सदर पदांवर फक्त मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे , सदर पदांसाठी आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी आपला अर्ज भरुन hr.chq@aaiclas.aero या मेलवर अथवा ऑफलाईन पद्धतीने Cargo Incharge AAICLAS of the station कार्यालयास सादर करावा .
वेतनमान : सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा 15,000/- मुळ वेतन + इतर भत्ते 25,430/- रुपये प्रतिमहा वेतन मिळणार आहे . तसेच वार्षिक वेतनवाढ ही मुळ वेतनाच्या 3 टक्के असणार आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..
- 🚆 भारतीय रेल्वेत 5,165 पदांची नवीन भरती!
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .