महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट अ व गट ब संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 66 ) पदनाम पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता याबाबत सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये गट अ संवर्गात सहसंचालक , सामान्य राज्य सेवा पदांच्या 04 जागा , उपसंचालक , सामान्य राज्य सेवा पदांच्या 34 जागा , सहाय्यक प्रारुपकार – नि – अवर सचिव पदांच्या 03 जागा , वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी , सामान्य राज्य सेवा पदांच्या 02 जागा अशा पदांकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
तर गट ब संवर्गांमध्ये सहाय्यक संचालक पदांच्या 02 जागा , उप अभिरक्षक पदांच्या 01 जाग , सहयोगी प्राध्यापक पदांच्या 04 जागा , प्राध्यापक पदांच्या 12 जागा , तंत्रशिक्षण सहसंचालक / संचालक पदांच्या 02 जागा , सहायक सचिव ( तांत्रिक ) पदांच्या 02 जागा अशा एकुण 66 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहसंचालक गट अ | 04 |
| 02. | उपसंचालक गट अ | 34 |
| 03. | सहाय्यक प्रारुपकार – नि-अवर सचिव गट अ | 03 |
| 04. | वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी गट अ | 02 |
| 05. | सहाय्यक संचालक गट ब | 02 |
| 06. | सहयोगी प्राध्यापक | 04 |
| 07. | तंत्रशिक्षण सहसंचालक / संचालक | 02 |
| 08. | सहायक सचिव | 02 |
| 09. | उप अभिरक्षक गट ब | 01 |
| 10. | प्राध्यापक | 12 |
| एकुण पदांची संख्या | 66 |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 11 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्गातील उमेदवारांकरीता 719/- रुपये तर मागास प्रवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरीता 449/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..