डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Dr. Babasaheb Ambedkar Technological University , Lonere Recruitment For Data Entry Operator , Clerk , Peon Number of Post Vacancy – 28 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.डाटा एन्ट्री ऑपरेटर : डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे बी.सी.ए / बी.सी.एस डिप्लोमा ( संगणक / माहिती तंत्रज्ञान ) किंवा सी.एस.ई अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदाकरीता प्रतिमहा 15,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .
02.लिपिक तथा टंकलेखक : लिपिक तथा टंकलेखक पदांच्या एकुण 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरीता उमेदवार हे कोणत्याही विद्या शाखेचा पदवी परीक्षा उत्तीर्ण तसेच इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान MSCIT , यांमध्ये वाणिज्य शाखेतील पदवी धारकास प्रथम प्राध्यान्य देण्यात येणार आहेत . सदर पदास प्रतिमहा 15,000/- रुपये वेतनमान देण्यात येणार आहेत .
03.शिपाई : शिपाई पदांच्या एकुण 25 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता प्रतिदिन 420/- याप्रमाणे वेतनमान देण्यात येणार आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण : केंद्र व उपकेंद्र / थेट मुलाखतीचा दिनांक / वेळ / ठिकाण याबात खालील नमुद सविस्तर पदभरती जाहीरात पाहा .

- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026