अन्न , नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग मध्ये गट क संवर्गातील 345 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Food , Civil Supplies And Cosumer Ptotection Department Recruitment For Group – C Post , Number of Post Vacancy – 345 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.पुरवठा निरीक्षक ( गट क ) : पुरवठा निरीक्षक पदांच्या 324 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी उत्तीर्ण ( अन्न व तंत्रज्ञान / अन्न व विज्ञान पदवी असणा-यास प्राधान्य ) असणे आवश्यक असणार आहेत .
02.उच्चस्तर लिपिक ( गट क ) : उच्चस्तर लिपिक पदांच्या 21 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 01.12.2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास / अनाथ / आदुघ प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ या संकेतस्थळावर दिनांक 31.12.2023 पर्यंत सादर करणे आवश्यक असणार आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता अराखीव प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / आदुघ / दिव्यांग / अनाथ प्रवर्ग करीता 900/- रुपये तर माजी सैनिक करीता आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 405 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !