जना स्मॉल फायनान्स बँकेत तब्बल 1000+ जागांसाठी महाभरती प्रक्रिया प्रोग्राम राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत मुदतमध्ये ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jana Small Finance Bank Recruitment For Assistant Manager Post , Number of Post Vacancy – 1000+ ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : सदर प्रोग्राम अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक ( Assistant Banker ) / Personal Banker पदांच्या 1,000+ जागांसाठी पदभरती प्रोग्राम राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Assistant Manager / Personal Banker Post , Number of Post Vacancy – 1000+ )
वेतनमान ( Salary Package – ) निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिवर्ष 4,00,000/- ऐवढे पॅकेज दिले जाते .
शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , इयत्ता 10 वी , 12 वी व पदवी मध्ये 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तसेच उमेदवाराचे वय हे 30 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक असेल .
निवड प्रक्रिया : उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने लेव्हल – 1 व लेव्हल – 2 ची Assessment परीक्षा घेतली जाईल , त्या आधारावर उमेदारांची निवड करण्यात येईल .
प्रोग्राम फीस : निवड झालेल्या उमेदवारांना बँकिंग प्रशिक्षण ( मनिपाल विद्यापीठ अंतर्गत ) करीता 99,000/-+18% GST रुपये फीस आकारण्यात येईल . यशस्वीरित्या प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर जना फायनान्स बँकेत ऑनरोल नोकरी करीता असताना 50 टक्के फीस परत केली जाते .
प्रशिक्षण कालावधी हे 03 महिन्याचे असते , त्यानंतर उमेदवारांस जना स्मॉल फायनान्स बँकेत नियमित स्वरुपात कोणत्याही शाखेत सहाय्यक मॅनेजर ( Assistant Manager ) या पदावर नोकरी दिली जाते .
अधिक माहितीसाठी / ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..