संस्कृती मंत्रालय अंतर्गत गट अ आणि क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

संस्कृती मंत्रालय अंतर्गत गट अ आणि क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Government Cultural Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रशासकीय अधिकारी01
02.ग्रंथपाल01
03.गाइड02
04.वाहनचालक02
05.सफाई कर्मचारी03
06.कारपेंटर01
07.सुरक्षा रक्षक01
 एकुण पदांची संख्या11

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : कोणतीही पदवी सह सरकारी कार्यालय किंवा स्वायत्त संस्था मध्ये 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक .

हे पण वाचा : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1,100 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.02 साठी : मान्यताप्राप्त ग्रंथपालन विज्ञान मध्ये पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक , सदर कामाचा 05 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .

पद क्र.03 साठी :  कला शाखेतुन भारतीय इतिहास मध्ये पदवी उत्तीर्ण तसेच गांधीवादी दर्शनचे सखोल ज्ञान असणे आवयक , अनुभव असल्यास प्राधान्य .

पद क्र.04 साठी : इयत्ता आठवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच मोटार वाहन चाविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे , तसेच किमान 03 वर्षे वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे .

पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता पाचवी उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.06 साठी : इयत्ता आठवी व संबंधित क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.07  साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 8 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://gandhismriti.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment