न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय , महाराष्ट्र राज्य मध्ये विविध गट क संवर्गातील पदांच्या 125 जागेसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Laboratory department Recruitment For Various Class C Post , Number of Post Vacancy -125 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैज्ञानिक सहायक | 54 |
02. | वैज्ञानिक सहायक ( संगणक गुन्हे , ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण ) | 15 |
03. | वैज्ञानिक सहायक ( मानसशास्त्र ) | 30 |
04. | वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | 30 |
05. | वरिष्ठ लिपिक भांडार | 05 |
06. | कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | 18 |
07. | व्यवस्थापक ( उपहारगृह ) | 01 |
एकुण पदांची संख्या | 125 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे विज्ञान शाखेतील रसायन शास्त्र विषयासह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र / संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स / माहिती आणि तंत्रज्ञान या विषयास पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्याय सहायक विज्ञान या विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !
पद क्र.03 साठी : मानसशास्त्र विषयातील पदवी अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत ( HSC ) प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.06 साठी : विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.07 साठी : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान क्षेत्रातील किमान 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://dfsl.maharashtra.gov.in/ हे या संकेतस्थळावर दिनांक 21.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये माजी सैनिक / दिव्यांग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !