IDBI बँकेत तब्बल 500 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

आयडीबीआय बँकेत तब्बल 500 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Industrial Development Bank of India Recruitment For Junior Assistatnt Manager Post Number of Post Vacancy – 500 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकुण 500 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , संवर्गनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहेत .

संवर्गपदसंख्या
UR203
SC75
ST37
EWS50
OBC135
एकुण पदांची संख्या500

हे पण वाचा : राज्य शासन सेवेत महाभरती 2024 , अर्ज करायला विसरु नका !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educaiton Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx या संकेतस्थळावर दि.12 फेब्रुवारी 2024 पासुन ते दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / इतर मागास प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग मधील उमेदवारांकरीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment