ASC : लिपिक , सफाईगार , चौकीदार , स्वयंपाकी इ.पदांसाठी सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !

Spread the love

इयत्ता दहावी पात्र उमदेवारांना लिपिक , सफाईगार , चौकीदार ,स्वयंपाकी अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन /पोस्टाद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांनुसार आवश्यक पात्रता , पदसंख्या , इतर आवश्यक कौशल्ये इ.बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूयात .

भारतीय लष्करी ASC सेंटर करीता सदर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यामध्ये ASC सेंटर ( साऊथ ) -2ATC मध्ये स्वयंपाकी पदांच्या 02 जागा , सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर पदांच्या 19 जागा , लिपिक पदांच्या 05 जागा , ट्रेड्समन मेट पदांच्या 109 जागा , टिन स्मिथ पदांच्या 08 जागा तर बार्बर पदांच्या 03 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : पुणे येथे विविध पदांसाठी मेगाभर्ती !

तर ASC सेंटर ( नॉर्थ ) -1 ATC मध्ये चौकीदार पदांच्या 17 जागा , वाहनचालक पदांच्या 37 जागा , सफाईगार पदांच्या 05 जागा , मेकॅनिक पदांच्या 12 जागा , कारपेंटर पदांच्या 11 जागा , फायरमन पदांच्या 01 जागा , फायर इंजिन ड्राइव्हर पदांच्या 04 जागांसाठी असे एकुण मिळून 236 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

पात्रता – वरील पदांपैकी कनिष्ठ लिपिक पदांकरीता उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर इतर उर्वरित सर्वच पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी ( SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : औरंगाबाद खंड पीठ येथे फक्त 4 थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ASC सेंटर ( साऊथ ) -2ATC करीता The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) –2 ATC, Agram Post, Bangalore  या पत्त्यावर तर ASC सेंटर ( नॉर्थ ) -1 ATC करीता The presiding Officer Civilian Direct Recruitment Board , CHQ ,ASC Centre North , Agram Post , Bangalore या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे . सदर पद भरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क ( परीक्षा शुल्क ) आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment