महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषेदेमध्ये विविध पदांच्या तब्बल 18,939 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , पदभरती प्रक्रिया बाबत राज्य शासनांकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . यामध्ये पदांनुसार आवश्यक पात्रता नमुद करण्यात आलेला आहे , पदांनुसार आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे पाहुयात .
1.ग्रामसेवक पदांसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ./ कषी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक / अभियांत्रिकी पदविका / समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक . अथवा शासन मान्य संस्थेमधून समाजकल्याण विभागाची B.S.W उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
2. औषध निर्माता पदांकरीता उमेदवार हा डी.फार्मा / बी.फार्मा तसेच उमेदवारांने संगणक हाताळणी प्रमाणपत्र परीक्षा MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
3.आरोग्य सेवक / सेविका / फवारणी कर्मचारी – आरोग्य सेवक / सेविका पदांकरीता उमेदवार हा बारावी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर फवारणी कर्मचारी पदांकरीता उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण व फवारणी / मलेरिया फवारणी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
4.शिक्षक – शिक्षक पदांकरीता उमेदवार हा डी.एड / बी.एड त्याचबरोबर राज्य शासनाने लागु केलेली TAIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
5. अभियंता पदांकरीता उमेदवार हा संबंधित पदांनुसार विषयांसह अभियांत्रिकी डिप्लोमा / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
6.विस्तार अधिकारी – विस्तार अधिकारी पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
7.कनिष्ठ लिपिक – कनिष्ठ लिपिक पदांकरीता उमेदवार हा इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवाराने मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
8.प्रयोगशाळा सहाय्यक – प्रयोगशाळा सहाय्यक पदांकरीता उमेदवार हा इयत्ता बारावी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , वैद्यकीय प्रयोगशाळा सहाय्यक पदांकरीता उमेदवार विज्ञान शाखेतुन बारावी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
9.कृषी सेवक – कृषी सेवक पदांकरीता उमेदवार हा कृषी डिप्लोमा धारक असणे आवश्यक आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .