महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागामध्ये 20 हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती . परंतु सदर पदभरती प्रक्रियेला मुहुर्तच लागत नव्हता . परंतु आता सदर अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या पदभरती प्रक्रियेला वेग लागला आहे .सदर पदभरती प्रक्रिया ही केवळ महिला उमेदवारांकरीता राखीव आहे .
राज्यामध्ये नविन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडीचे महत्व वाढणार आहे . कारण इयत्ता पहिली व दुसरी पर्यंतचे शिक्षण अंगणवाडीमध्येच मिळणार आहेत .यामुळे राज्यातील अंगणवाडी अधिक कार्यक्षम व रिक्त पदांवर त्वरीत पदभरती करण्याचा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आलेला आहे .अंगणवाडी सेविका व मदतनिस पदांच्या सुमारे 20 हजार जागांसाठीची पदभरती जाहीरात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बालविकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे .
राज्यातील सर्वच जिल्ह्यातील रिक्त अंगणवाडी सेविका व मदतनिस पदांचे एकुण 20,186 जागा रिक्त आहेत . सदर रिक्त पदांवर पात्रताधारक महिला उमेदवारांकडून दि.15 मार्च 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार असून अर्ज सादर करण्याची शेवटची दि.30 मार्च 2023 असणार आहे .
पात्रता – यामध्ये अंगणवाडी सेविका पदांकरीता महिला उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर अंगणवाडी मदतनिस पदांकरीता महिला उमेदवार ही इयत्ता 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांकरीता स्थानिक महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल .
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया 2027 अंतर्गत भरती ..
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 148 रिक्त जागेसाठी पदभरती .
- AVNL : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1213 रिक्त जागेसाठी पदभरती ..