बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी स्केल 3 आणि अधिकारी स्केल 2 पदांच्या तब्बल 400 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank Of Maharashtra Recruitment For Officer Scale III & Officer Scale II , Number of Post Vacancy – 400 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अधिकारी स्केल – 3 : अधिकारी स्केल – 3 पदांच्या एकुण 100 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदास उमेदवार हा 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतुन पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे .यांमध्ये मागास वर्गीय / इतर मागास प्रवर्ग मधील उमेदवारांना गुणांमध्ये 5 टक्के सवलत देण्यात आली आहे .
अधिकारी स्केल -2 : अधिकारी स्केल 2 पदांच्या एकुण 300 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदास उमेदवार हा 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतुन पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे .यांमध्ये मागास वर्गीय / इतर मागास प्रवर्ग मधील उमेदवारांना गुणांमध्ये 5 टक्के सवलत देण्यात आली आहे . अथवा CA /CFA /MA उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : नगरपरिषद राज्यसेवा गट क संवर्ग मध्ये 1782 जागेसाठी महाभरती !
वयोमर्यादा : अधिकारी स्केल -3 पदांकरीता उमेदवाराचे वय दिनांक 31 मार्च 2023 रोजी 25 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणर आहे . तर अधिकारी स्केल – 2 पदांकरीता उमेदवाराचे वय 28 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://ibpsonline.ibps.in/bmcgomay23/ या संकेतस्थळावर दिनांक 13 जुलै 2023 पासून ते दिनांक 25 जुलै 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरतीकरीता उमेदवारांकडून परीक्षा शुल्क म्हणून 1180/- रुपये तर मागास प्रवर्गाकरीता 118/- रुपये आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .