BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 680 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 680 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BHEL Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 680 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम पदांची संख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदवीधर अप्रेंटिस (शिकाऊ )179
02.तांत्रिक अप्रेंटिस (शिकाऊ )103
03.ट्रेड अप्रेंटिस (शिकाऊ )398
 एकुण पदांची संख्या680

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पद क्र.01 व 02 करीता उमेदवार हे 70 टक्के गुणांसह बी. कॉम / बी.ए / इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण आवश्यक असणार आहेत तर पद क्र.03 करीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : आदिवासी विभाग मध्ये मोठी महाभरती, लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC / ST  प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://trichy.bhel.com/tms/app_pro/index.jsp या संकेतस्थळावर दिनांक 01.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत सदर भरती करीता परीक्षा / आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment