कर्मचारी निवड आयोग मार्फत इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 26,146 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission Recruitment For GD Constable , Number of Post Vacancy – 26,146 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | BSF | 6114 |
| 02. | CISF | 11025 |
| 03. | CRPF | 3337 |
| 04. | SSB | 665 |
| 05. | ITBP | 3189 |
| 06. | AR | 1490 |
| 07. | SSF | 296 |
| एकुण पदांची संख्या | 26146 |
आवश्यक शैक्षणिक / शारीरिक अर्हता : यांमध्ये सदर सर्व पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच पुरुष उमेदवारांकरीता किमान उंची ही 170 से.मी ( अनुसुचित जमाती करीता 162.5 से.मी ) तर छाती 80 से.मी ( अनुसुचित जमाती प्रवर्ग करीता 76/5 से.मी ) व 5 से.मी फुगवता आली पाहिजे . तर महिला उमेदवारांकरीता किमान उंची ही 157 से.मी तर अनुसुचित जमाती उमेवारांकरीता 07 से.मी सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : मुंबई ,पुणे , नागपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 जोनवारी 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 23 वर्षे तर SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्ष सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31 डिसेंबर 2023 रात्री 11.00 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती करीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..