मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदांपैकी तब्बल दहा हजार जागांसाठी मोठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येतणार आहे .या संदर्भात महानगरपालिका प्रशासनांकडून सविस्तर रिक्त पदांचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे . मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात पदे हे रिक्त आहेत , शिवाय अनेक पदे हे कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने भरलेले आहेत .
राज्य शासनाने दिलेल्या अध्यादेशानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त जागांपैकी पहिल्या टप्यात दहा हजार जागेवर मोठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .कोरोना महामारीमुळे सदर पदभरती प्रक्रियेत खंड निर्माण झालेला होता . आता राज्य शासनाने पदभरती प्रक्रिया बाबत काढलेल्या अध्यादेशामुळे महापालिकेत विविध विभागांमध्ये रिक्त असणाऱ्या पदांवर पदभरती प्रक्रिया राबविली जाणार आहे .यामध्ये शिक्षक ,अधिकारी , नियंत्रण अधिकारी ,सहाय्यक ,लिपिक , लेखापाल , शिपाई , चौकीदार , कामाठी अशा विविध वर्ग – 3 व वर्ग – 4 पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
रिक्त जागांपैकी तब्बल 1600 लिपिक पदांच्या जागा रिक्त –
मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक संवर्गातील सर्वात जास्त पदे रिक्त आहेत . या लिपिक संवर्गातील तब्बल 1600 पदे रिक्त आहेत .शिवाय आता आवश्यकतेनुसार , आणखीण पदे निर्माण करण्यात येणार आहे .सदर पदभरती प्रक्रीया ही टीएीएस आणि आयबीपीएस कंपनींच्या माध्यतून घेण्यात येणार आहेत .
या संदर्भातील पदभरती प्रक्रिया ही पुढील आठवड्या राबविण्यात येणार आहे .यामुळे राज्यातील तब्बल 10 हजार बेरोजगारांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे .सदर पदभरती लवकरात लवकर सुरु करण्याचे अध्यादेश राज्य शासनाकडुन काढण्यात आलेला आहे .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !