बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये अग्निशामक पदांच्या एकुण 910 जागासांठी सर्वात मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक व शारीरीक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Brihanmumbai Municipal Corporation Recruitment For Fireman Post , Number of Post vacancy – 910 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – अग्निशामक ( एकुण पदांची संख्या – 910 )
पात्रता – उमेदवार हा कला / विज्ञान / वाणिज्य शाखेतुन 50 टक्के गुणासह 12 वी उत्तीर्ण असणे असणे आवश्यक आहे . किंवा 10 वी उत्तीर्ण व भारतीय सेनेमध्ये 15 वर्षे सेवा पुर्ण केलेले जवान या भरती प्रक्रियेस पात्र ठरतील .तसेच सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवाराचे वय दि.31.12.2022 रोजी 20 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे , मागासवर्गीय उमेदवारांकरीता वयामध्ये 5 वर्षे सुट देण्यात येईल .
शारीरिक पात्रता – पुरुष उमेदवारांची उंची 171 से.मी. असणे आवश्यक आहे तर महिला उमेदवारांकरीता 162 से.मी असणे आवश्यक आहे तर पुरुष / स्त्री उमेदवाराचे वजन किमान वजन 50 कि.ग्रॅम असणे आवश्यक आहे . पुरुष उमदेवारांकरीता छाती 81 से.मी तर फुगवून 86 से.मी असणे आवश्यक आवश्यक .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – भरती करीता उमेदवारांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान BCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर , मंडपेश्वर दहीसर मुंबई 400103 या ठिकाणी दि.13 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये हजर रहायचे आहे .सदर पदभरती करीता 944/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागासवर्गीय / अनाथ उमेदवारांकरीता 590/- रुपये आवेदन शुल्क आकरण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !