शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाने निर्णय घेतला आहे जे शेतकरी आहे त्यांच्या सोयाबीनच्या उत्पादनावर त्यांना 113 कोटी रुपयांचा अनुदान शासनाकडून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी लोकांसाठी शासन नवीन नवीन योजना राबवित आहे.
मुसळधार पाऊस, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे त्यांच्या उत्पादनाचे नुकसान होते त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थिती मध्ये बिघाड निर्माण होते त्यासाठी शासन शेतकरी बांधवांना अनुदान देत आहे. अशा योजनेचा फायदा शेतकरी बांधवांनी आवश्य घ्यावा. अशा योजनेची अंमलबजावणी करणे फार कठिण जात असते, परंतु उशीर झाला तरी चालेल तरी पण शासन शेतकर्यांना मदत करीत असते. आता शेतकरी बांधवांसाठी शासनासमोर गांभीर प्रश्न निर्माण झाला. तसा जरा विचार केला तर 2016-17 मध्ये सोयाबीनचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात झाले.
उत्पादन जास्त झाल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनाची विक्री किमतीतही खूप कमी होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले, आणि उत्पादनासाठी लावलेल्या पैशाचा सुद्धा खूप खर्च झाला. याच कारणासाठी शासनाने योजना तयार करून शेतकरी बांधवांना अनुदान द्यावे असा निर्णय घेतला.
ऑक्टोबर 2016 ते डिसेंबर 2016 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनची विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केली आहे, अशा शेतकर्यांना 200 रुपये प्रति क्विंटल एवढे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जेणेकरून त्यांचे उत्पादन विक्रीत घट येऊ नये, त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने ही योजना राबविली आहे. या सोयाबीनच्या उत्पादनावर शासनाने 25 क्विंटल पर्यंतची मर्यादा दिली आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना 25 क्विंटल सोयाबीनवर 200 रुपये अनुदान सरकारने घोषित केले आहे. तेव्हापासून या शेतकरी बांधवांचे अनुदान घोषित करून त्यांना 113 कोटी रुपयांचा निधी घोषित करण्यात आला आहे.
यासाठी शासनाने 5 डिसेंबर 2022 या दिवशी एक शासन निर्णय घोषित केला आणि त्यामधून 113 कोटी रुपयांची रक्कम सुद्धा देण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच शेतकर्यांना या अनुदानाचा लाभ लवकरच होणार आहे असा शासन निर्णय मंजूर करण्यात आला.
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 934 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOBCAPS : कॅपिटल मार्केट्स लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती .
- रयत शिक्षण संस्था : कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक शाळा अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !