केंद्र सरकारच्या अधिनस्थ सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय बँकापैकी असणारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 5000+ जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Central Bank of India Recruitment for 5000+ post Vacancy ) पदांचा सविस्तर तपशिल , पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
सदरची पदभरती ही अप्रेटिंस कायदा 1961 नुसार करण्यात येत असून , उमेदवारांच्या कामाच्या क्षमतेनुसार कायमस्वरुपी पद्धतीने सेवेत कायम करण्यात येतील .सदर पदभरती ही देशातील सर्व शाखेकरीता राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन / मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये एकुण 5000+ जागेकरीता पदभरती राबविण्यात येत असून , यापैकी महाराष्ट्र राज्यातील शाखांकरीता एकुण 629 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यामध्ये राज्यातील सर्वच विभागानुसार सर्वच शाखांमध्ये रिक्त जागेवर पदभरती करण्यात येत आहे .तसेच आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता अतिरिक्त 26 पदांवर पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
सदर पदभरती जाहीरातीमध्ये राज्यांनुसार रिक्त जागांचे विवरण देण्यात आलेले आहेत , परंतु उमेदवार हा कोणत्याही राज्यांमध्ये अर्ज सादर करु शकेल .
अर्ज ( Online Process ) – जाहीरातीनुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज हा Online पद्धतीने या नमुद Website वर जावून दि.03 एप्रिल 2023 पर्यंत सादर करु शकता .या बँक पदभरती करीता उमेदवारांकडून 800/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास प्रवर्ग / महिला उमेदवारांना 600/- व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना 400/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !