CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दल मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्रीय राखीव पोलस पदमध्ये कॉन्स्टेबल पदाच्या 169 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Reserve Police Force Recruitment For Constable Post , Number of Post Vacancy – 169 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कॉन्स्टेबल ( GD ) खेळाडू पदांच्या एकुण 169 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Constable Post , Number of Post Vacancy – 169 )

आवश्यक अर्हता ( Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधीत्व केलेले / A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केलेले / राज्य शालेय संघाचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : एनएलसी इंडीया मध्ये विविध पदांच्या तब्बल 632 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यामध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 10 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 08 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.crpf.gov.in/  या संकेतस्थळावर दिनांक 15.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment