भारतीय रेल्वेच्या उत्तर – पुर्व विभागांमध्ये तब्बल 1104 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदसंख्या , आवश्यक पात्रता , इत्यादी पदभरती प्रक्रिया जाहीरात पुढील प्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये मेकॅनिकल वर्कशॉप गोरखपुर करीता 411 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे , तसेच सिग्नल वर्कशॉप गोरखपुर कॅन्टोनमेन्ट करीता 63 जागां , ब्रिज वर्कशॉप गोरखपुर कॅन्टोनमेन्ट करीता 35 जागा , मेकॅनिकल वर्कशॉप इज्जत नगर करीता 151 जागा , डिझेल शेड इज्जतनगर करीता 60 जागा , कॅरेज आणि वॅगन शेड इज्जतनगर करीता 64 जागा , कॅरेज आणि वॅगन शेड लखनऊ जंक्शन करीता 155 जागा , डिझेल शेड गोंदा करीता 90 जागा , तर कॅरेज आणि वॅगन शेड वाराणसी करीता 75 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता : सदर पदांकरीता उमदेवार हा इयत्ता 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच आयटीआय मधून इलेक्ट्रिशिअन / कारपेंटर / पेंटर / फिटर / वेल्डर / / मेकॅनिस्ट / टर्नर अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : खनिज विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 02 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय 15 ते कमाल 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . यांमध्ये अनुसुचित जाती / जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात आली आहे .
हे पण वाचा :राज्य शासनांच्या महसूल व वन विभागांमध्ये 4,644 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://rrcgorakhpur.net/index.php या संकेतस्थळावर दिनांक 02 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .या भरती करीता उमेदवारांकडून 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत तर महिला / मागास प्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- GGMCJJH : सर जे.जे समूह रुग्णालय मुंबई अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर व शिपाई पदांसाठी पदभरती !
- माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ रायगड अंतर्गत प्राध्यापक , ग्रंथालय लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , तंत्रज्ञ , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 63 रिक्त जागेसाठी पदभरती !
- BIS : भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत 160 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !