कॉसमॉस बँकेमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदांचे नावे , पदसंख्या आवश्यक शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. ( Cosmos Bank Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 220 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
1.मॅनेजर : मॅनेजर या पदांच्या एकुण 25 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता प्रथम श्रेणी बी.कॉम अथवा एमबीए , JAIIB / CAIIB / CA / ICWA व दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
2.कार्यालय व्यवस्थापक : कार्यालय व्यवस्थापक पदांच्या एकुण 25 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , उमेदवार सदर पदांकरीता प्रथम श्रेणी बी.कॉम अथवा एमबीए , JAIIB / CAIIB / CA / ICWA व पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
3.ऑफिसर : ऑफीसर या पदांच्या एकुण 50 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे प्रथम श्रेणी बी.कॉम अथवा एमबीए , JAIIB / CAIIB / CA / ICWA व तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
4.मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकुण 100 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मार्केटिंग मधील स्पेशलयलेशनसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच 02 /03 वर्षांचा सबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
5. टीम लीडर – मार्केटिंग : टीम लीडर मार्केटिंग पदांच्या एकुण 20 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे हे मार्केटिंग मधील स्पेशलयलेशनसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच 7 वर्षांचा सबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.cosmosbank.com/career-form.aspx या संकेतस्थळावद दिनांक 11.08.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !