मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय मध्ये इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ministry of Finance Department of Revenue Office of The Commissioner of Customs Mumbai Recruitment For Staff Car Driver , Number of Post Vacancy -28 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कार कर्मचारी वाहनचालक पदांच्या 28 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Mumbai Recruitment For Staff Car Driver , Number of Post Vacancy -28 ) संवर्ग निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
| संवर्ग | पदांची संख्या |
| खुला प्रवर्ग | 13 |
| इतर मागास प्रवर्ग | 07 |
| अनुसुचित जाती | 04 |
| अनुसुचित जमाती | 02 |
| आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग | 02 |
| एकुण पदांची संख्या | 28 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच मोटार कारसाठी वैध वाहन चालविण्याचा परवाना धारक असणे आवश्यक असेल , तसेच मोटार यंत्रणेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 20.02.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Deputy Commissioner Of Customs , Office Of the Pr. Chief Commissioner of Customs , New Custom House , Ballard Estate Mumbai – 400001 या पत्यावर दिनांक 20.02.2024 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .