DPS DAE : खरेदी व भांडार संचालनालय मध्ये विविध पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

DPS DAE : खरेदी व भांडार संचालनालय मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government Of India Department of atomic Energy Directorate of Purchase and Stores Recruitment For Variou Post , Number of Post Vacancy – 62 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.कनिष्ठ खरेदी सहाय्यक ( JPA ) : सदर पदांच्या एकुण 17 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बी.एस्सी / बी.कॉम अथवा 60 टक्के गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉन्स / संगणक विज्ञान इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

02.कनिष्ठ भांडारपाल ( JSK ) : कनिष्ठ भांडारपाल पदांच्या 45 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे हे 60 टक्के गुणांसह बी.एस्सी / बी.कॉम अथवा 60 टक्के गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉन्स / संगणक विज्ञान इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : नागपूर पालिका प्रशासन मध्ये मोठी महाभरती 2023

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2023 उमदेवाराचे वय हे 18 वर्षे ते 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागासप्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://dpsdae.formflix.in/index.php या संकेतस्थळावर दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment