आर्थिक व सांख्यिकी सेवा मध्ये पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

भारतीय आर्थिक व सांख्यिकी सेवा मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Public Service Commission , Recruitment for Economic & Statistical Service 2023 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

यांमध्ये भारतीय आर्थिक सेवा अंतर्गत 18 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र / व्यवसाय अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर सदर सेवांतर्गत अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.01.08.2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षांदरम्यान वयोमर्यादा असणे आवश्यक आहे .

हे पण वाचा :जिल्हा व सत्र न्यायालय भंडारा येथे पदभरती प्रक्रिया !

तर भारतीय सांख्यिकी सेवा मध्ये एकुण 33 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा सांख्यिकी / सांख्यिकी गणित / उपयोजित सांख्यिकीसह पदवी / सांख्यिकी / सांख्यिकी गणित / उपयोजित सांख्यिकी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . . तर सदर सेवांतर्गत अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.01.08.2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षांदरम्यान वयोमर्यादा असणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी पदभरती प्रक्रिया

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर दि.09.05.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . या पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क म्हणून 200/- तर मागास प्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग / महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारेच आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment