राज्य विमा महामंडळ मध्ये विविध गट क संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Employee’s State Insurance Corporation Recruitment For Various Class C Post Number of Post Vacancy – 71 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ECG तंत्रज्ञ03
02.कनिष्ठ रेडिओग्राफर14
03.कनिष्ठ मेडिकल प्रयोगशाळा तंत्रज्ञ21
04.मेडिकल रेकॉर्ड सहाय्यक05
05.ओटी सहाय्यक13
06.फार्मासिट ( ॲलोपॅथी )12
07.रेडिओग्राफर03
 एकुण पदांची संख्या71

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पद क्र.01 साठी : 12 वी विज्ञान उत्तीर्ण आवश्यक तसेच ECG डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक आहे .

पद क्र.02 साठी : 12 वी विज्ञान उत्तीर्ण आवश्यक तसेच रेडिओग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक असणार आहे .

पद क्र.03 साठी : 12 वी विज्ञान उत्तीर्ण आवश्यक तसेच MLT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

पद क्र.04 साठी : 12 वी विज्ञान उत्तीर्ण आवश्यक तसेच मेडिकल रेकॉर्ड तंत्रज्ञ ट्रेनिंग असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : सरकारी नोकरीच्या 250 जागांसाठी मोठी महाभरती !

पद क्र.05 साठी : 12 वी विज्ञान उत्तीर्ण आवश्यक तसेच ओटी मध्ये एक वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.06 साठी : बी फार्मा अथवा 12 वी नंतर डी.फार्म अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.07 साठी : 12 वी विज्ञान उत्तीर्ण आवश्यक तसेच रेडिओग्राफी डिप्लोमा व एक वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/esicjan23/index.php या संकेतस्थळावर दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग व महिला व माजी सैनिक उमेदवारांकरीता 250/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment