मेगाभरती 2023 : पदवीधारक उमेदवारांसाठी तब्बल 3,049 जागेसाठी सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी , लगेच करा आवेदन !

Spread the love

पदवी धारक उमेदवारांसाठी भारतीय बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत तब्बल 3049 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Institute of Banking Personnel Selection Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 3049 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्रोबेशनरी अधिकारी ( PO ) / मॅनेजमेंट ट्रेनी ( MT ) पदाच्या तब्बल 3049 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . यापैकी एसी प्रवर्गातील उमदेवारांकरीता 462 जागा , एसटी प्रवर्गाकरीता 234 जागा , ओबीसी प्रवर्गाकरीता 300 जागा , आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गा करीता 300 जागा तर खुला प्रवर्गाकरीता 1224 जागा अशा एकुण 3049 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

प्रवर्गपदसंख्या
SC462
ST234
OBC829
EWS300
UR1224
एकुण पदांची संख्या3049

पात्रता : सदर पदाकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर दिनांक 01 ऑगस्ट 2022 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

हे पण वाचा : PMC : पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या तब्बल 236 जागांसाठी पदभरती आत्ताची नविन जाहीरात प्रसिद्ध , Apply Now !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/ या संकेतस्थळावर दिनांक 21 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / इतर मागास प्रवर्गाकरीता 850/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग उमेदवारांकरीता 175/- रुपये आवेदन शुल्क आकारले जाणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment