PMC : पुणे महानगर पालिकेमध्ये आताची मोठी महाभरती , APPLY NOW !

Spread the love

पुणे महानगरपालिकेमध्ये आत्ताची मोठी भरती प्रक्रिया राबवली जात असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवाराकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदनाम ,पदांची संख्या ,आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर पद भरती जाहिरात पुढील प्रमाणे पाहूयात ..

1.उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक : उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण 54 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता उमेदवार हे इयत्ता बारावी व शिक्षण शास्त्र मधील डीएड ,उर्दू माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी (TET) उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे ..

02.विशेष शिक्षक : विशेष शिक्षक पदांच्या एकूण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता उमेदवार हे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर बौद्धिक अक्षम प्रवर्गातील प्रशिक्षित पदविका डी एस सी व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक असणार आहे ..

हे पण वाचा : महाराष्ट्र क्रिडा व युवक सेवा संचालनालय मध्ये अधिकारी , लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

03.इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक : इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण 97 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता इयत्ता पहिली ते बारावी इंग्रजी माध्यमातून शिक्षण त्याचबरोबर डीएड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर टी ई टी उत्तीर्ण उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : यामध्ये उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक व इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक या पदासाठी शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोफखाना शिवाजीनगर पुणे या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे . तर विशेष शिक्षक या पदाकरिता विशेष मुलांची शाळा महानगरपालिका शाळा क्रमांक 14 काँग्रेस भवन मार्ग शिवाजीनगर पुणे या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत ..

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहावी

जाहिरात पाहा

Leave a Comment