इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( India Post Payments Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 132 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : इंडिया पोस्ट पेमंट्स बँकेमध्ये एक्झिक्युटिव पदांच्या एकुण 132 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यापैकी जनरल प्रवर्गाकरीता 56 जागा , आर्थिक द्ष्ट्या मागास प्रवर्गाकरीता 13 जागा , इतर मागास प्रवर्गाकरीता 35 जागा , अनुसुचित जाती करीता 19 जागा , अनुसुचित जमाती प्रवर्गाकरीता 09 जागा असे एकुण 132 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत ..
पात्रता : सदर एक्झिक्युटिव या पदाकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , त्याचबरोबर उमेदवाराचे वय दिनांक 01 जून 2023 रोजी किमान वय 21 वर्षे तर कमाल वय 35 वर्षे दरम्यान तर SC /ST प्रवर्गाकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : उल्हासनगर महानगरपालिका ठाणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://majhinaukri.in/ippb-recruitment/ या संकेतस्थळावर दिनांक 16 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . तसेच सदर पदांसाठी आवेदन सादर करण्यासाठी जनरल / इतर मागास प्रवर्गाकरीता 300/- रुपये तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी लातुर अतंर्गत विविध पदांसाठी पदभरती ..
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 821 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- आखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे अंतर्गत अधिकारी , अधिक्षक , लेखापाल , टर्नर शिपाई इ . पदांसाठी पदभरती .
- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण तथा भुमि उपयोग नियोजन ब्युरो नागपुर अंतर्गत सहाय्यक , कनिष्ठ / वरिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती …
- श्रीयश प्रतिष्ठान छ.संभाजीनगर अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक , कामगार इ . पदांसाठी पदभरती ..