प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

आदिवासी विकास विभागाकडून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत आहेत , यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली एकात्मिक आदिवासी प्रकल्प अस्तित्वात असून , सदर प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रमशाळा यांच्यामध्ये रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या रिक्त पदावर मोठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . पदनाम , पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, मानधन यासंदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया..

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक : कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक यामध्ये गणित ,रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांच्या अध्यापनाकरिता पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता उमेदवार एम .एस. सी , बी .एड उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , सदर पदावर निवड झालेल्या उमेदवारास प्रती घड्याळी तास 150/- रुपये तासिका प्रमाणे मानधन अदा करण्यात येणार आहे .

माध्यमिक शिक्षक : माध्यमिक शिक्षक यामध्ये इंग्रजी , गणित , विज्ञान ,मराठी, जनरल या विषयाकरिता पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदास बी.ए / बी.एस्सी, बीएड उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदावर निवड झालेल्या उमेदवारास प्रति घडयाळी 140/- रुपये तासिका प्रमाणे मानधन अदा करण्यात येणार आहे .

पदवीधर प्राथमिक शिक्षक : इंग्रजी या विषयाकरिता पदवीधर प्राथमिक शिक्षक पदाची नियुक्ती करण्यात येणार असून , सदर पदास उमेदवार बीए , बीएड शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदावर निवड झालेल्या उमेदवारास प्रति घड्याळी तास 140/- रुपये प्रमाणे मानधन अदा करण्यात येणार आहे .

हे पण वाचा : न्यु इंडिया विमा कंपनी मध्ये विविध पदांच्या तब्बल 450 जागेसाठी महाभरती  ! 80,000/- रुपये मिळेल पगार !

प्राथमिक शिक्षक : इंग्रजी / मराठी माध्यम या विषयाकरिता प्राथमिक शिक्षकांची पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदास बारावी , डीएड शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदावर निवड झालेल्या उमेदवारास प्रति घड्याळी तास 125 प्रमाणे मानधन अदा करण्यात येईल .

निवड प्रक्रिया : वरील सर्व पदाकरिता थेट मुलाखती द्वारे प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथे सकाळी 11 वाजता थेट मुलाखतीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे .

माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

Leave a Comment