भारतीय टपाल विभागामध्ये  पोस्टमन /मेलगार्ड/MTS पदांच्या 98,083 जागेसाठी मेगाभरती .नोटीफिकेशन जारी .

Spread the love

भारतीय टपाल विभागामध्ये पोस्टमन / मेलगाई / MTS  पदांच्या 98083 जागेसाठी भरती प्रकियेबाबत पोस्ट खात्याकडुन नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे .सर्व राज्यातील पोस्टमन / मेलगार्ड व MTS  पदांसाठी रिक्त पदांचा अहवाल सदर नोटीफिकेशन मध्ये जारी करण्यात आले असून , सदर रिक्त पदांवर केंद्र सरकारकडुन लवकरात लवकर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे .या संदर्भातील भरती अपडेट पुढीलप्रमाणे सविस्तर पाहुयात .

यामध्ये एकुण 98083 जागा रिक्त असुन यापैकी पोस्टमन पदांच्या एकुण 59099 जागा , मेलगार्ड पदांच्या एकुण 1445 जागा तर मल्टी टास्किंग पदांसाठी एकुण 37,539 जागा रिक्त आहेत .यापैकी महाराष्ट्र सर्कल मधील पोस्टमन पदांच्या एकुण 9884 जागा , मेलगार्ड पदांच्या एकुण 147 जागा तर MTS पदांच्या एकुण 5478 जागा रिक्त आहेत .यासंदर्भात पोस्ट खात्याकडुन रिक्त अहवाल बाबत शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहेत . यामध्ये सर्व राज्यातील पोस्ट खात्यातील पोस्टमन , मेलगार्ड व MTS रिक्त पदांचा नोटिफीकेशन अहवाल राज्यनिहाय जाहीर करण्यात आलेला आहे .

शैक्षणिक पात्रता – सदर पदांसाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर राज्यनिहाय राज्य भाषेचे ज्ञान असेण अनिवार्य करण्यात आले आहे . जसे कि , महाराष्ट्र सर्कल करीता मराठी / कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे

वेतनश्रेणी – सातव्या वेतन आयोगानुसार वरील नमुद सर्व पदांकरीता 21700-69100/- या वेतनश्रेणी लागु आहे .+ इतर देय वेतन व भत्ते लागु राहतील .

वयोमर्यादा –  उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे , ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षे सुट देण्यात येते .) टपाल विभागाकडुन रिक्त पदांबाबत जारी करण्यात आलेले नोटीफिकेशन पुढीलप्रमाणे आहे .

Leave a Comment