भारतीय डाक विभागामध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता ,विविध पदांच्या भरपुर जागेसाठी बम्पर भर्ती 2022

Spread the love

भारतीय डाक विभाग हे केंद्र शासनाच्या अधिनस्त असुन , टपाल विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामध्ये अधिक वेतन प्राप्त होते .यामुळे उमेदवारांचा जास्त कल केंद्र शासन सेवेत भर्ती होण्याचा असतो .केंद्र सरकारच्या सेवेत नोकरीची स्वप्न पाहण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी , भरती बाबत एक मोठी नोटीफिकेशन आलेली आहे .केंद्र सरकारच्या टपाल खात्यामध्ये भरपुर पदे रिक्त आहेत .यापैकी अत्यावश्यक पदेही ही सरळसेवा पद्धतीने भरली जात आहेत .

यामध्ये सध्या स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी भरती निघालेली आहे .याबाबतची सविस्तर नोटीफिकेशन पुढीलप्रमाणे पाहुयात .कार चालक पदासाठी पात्रता केवळ दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .शिवाय या पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा ही किमान वय 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा ही 27 वर्षे असणे आवश्यक आहे .शिवाय अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गाती उमेदवारांकरीता वयोमर्यादा मध्ये नियमानुसार सुट देण्यात आलेली आहे .त्याचबरोबर वैध वाहन चालविण्याचा हेवी व लाईट वाहन परवाना असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर कार चालविण्याचा चांगला अनुभव असणे आवश्यक आहे .

निवड प्रक्रिया –

उमेदवाराची निवड ही वाहन चालविण्याच्या कौशल्यावर आधारीत ,ड्रायव्हिंग टेस्ट व लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे  . यासाठी उमेदवारास ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार आहे . त्याचबरोबर सदर पदासाठी विधीत केल्याच्या शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे .लेखी परीक्षा ही वाहन चालविण्याचे कौशल्ये  यावर आधारीत असणार आहे .

आवेदन प्रक्रिया –

सदर पदासाठी आवश्यक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी दि.26.09.2022 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे .अर्ज सादर करताना जाहीरातीमध्ये नमुद सर्व कागतपत्रे विहित नमुन्यात उपबल्ध करुन घ्यावे .

या पदाची सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन जाहीरातीची सविस्तर नोटिफिकेशन डाऊनलोड करु शकता .

जाहिरात पाहा

Leave a Comment