भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मेगाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांच्या 330  जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Coast Guard Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 330 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

260 जागेसाठी पदभरती जाहीरात : यांमध्ये नाविक ( जनरल ड्युटी ) पदांच्या 260 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

शारीरिक पात्रता : उमेदवाराची किमान उंची 157 से.मी तर छाती 5 से.मी फुगवता आली पाहिजे .

हे पण वाचा : सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे गट क संवर्गातील सरळसेवा पद्धतीने मोठी पदभरती !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा दि.01.09.2002 ते दि.30.08.2006 दरम्यान झालेला असावा , तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login या संकेतस्थळावर दि .27.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

***********************************

उर्वरित 70 जागेसाठी जाहीरात :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.जनरल ड्युटी50
02.तांत्रिक ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स )20
 एकुण पदांची संख्या70

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार 60 टक्के गुणांसह पदवी तसेच 55 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी तसेच इयत्ता 12 वी मध्ये 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

शारीरिक पात्रता : उमेदवाराची किमान उंची 157 से.मी तर छाती 5 से.मी फुगवता आली पाहिजे .

हे पण वाचा : यूआर राव उपग्रह केंद्र मध्ये विविध पदांच्या 224 जागेसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 01 जुलै 2024 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://joinindiancoastguard.cdac.in/cgcat/ या संकेतस्थळावर दि . 19.02.2024 पासुन ते दिनांक 06.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment