भारतीय पुर्व रेल्वे विभाग मध्ये तब्ल 3,115 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Eastern Railway Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 3,115 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता , या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : आयटीआय प्रशिक्षणार्थी ( अप्रेंटिस ) पदांच्या तब्बल 3,115 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : सदर आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच संबंधित ट्रेड मध्ये ( फिटर / वेल्डर / मेकॅनिक /वायरमन / कारपेंटर / पेंटर / इलेक्ट्रिशियन / रेफ.आणि एसी मेकॅनिक ) आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : राज्य शासन सेवेत गट “क” संवर्गातील तब्बल 2,000+ जागांसाठी महाभरती !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 26.10.2023 रोजी किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वय 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://139.99.53.236:8443/rrcer/notice_board.html या संकेतस्थळावर दिनांक 27.09.2023 पासुन ते 26.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / महिला / अपंग उमेदवारांकरीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..