केंद्र सरकारच्या अधिनस्त यंत्र इंडिया महामंडळ , महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी 5,395 जागेवर मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारकांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांची संख्या , आवश्यक पात्रता , अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क बाबत सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
यामध्ये आयटीआय पदांचे एकुण 3,508 जागा असून उर्वरित 1887 पदे नॉन आयटीआय पदे आहेत .असे एकूण 5,395 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सदर पदभरती प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या अधिनस्त असून ,महाराष्ट्र राज्यातील स्थित नागपूर येथील कार्यालयाकरीता पदभरती प्रक्रिया प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
पात्रता – यामध्ये आयटीआय पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी 50 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक असून संबंधित ट्रेड ( विषयामध्ये ) आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर नॉन आयटीआय पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी मध्ये 50 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद आयटीआय व नॉन आयटीआय पदांकरीता आवश्यक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज https://www.yantraindia.co.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दि.30 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर पदांकरीता ओपन / इतर मागास प्रवर्गाकरीता 200/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तर मागासवर्गीय / महीला उमेदवारांकरीता 100/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..