MIDC : औद्योगिक महामंडळामध्ये 5,395 जागेसाठी मेगाभर्ती ! कोणतीही परीक्षा नाही , 10 वीच्या गुणांच्या आधारे निवड !

Spread the love

भारत सरकारच्या यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या नागपूर येथील औद्योगिक महामंडळामध्ये तब्बल 5,395 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ,पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे . सविस्तर पदभरती तपशील पुढील प्रमाणे पाहूया ..

पदनाम – यामध्ये प्रामुख्याने आयटीआय पात्रता धारक व नॉन आयटीआय अशा दोन पदांच्या एकूण 5,395 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तर यामध्ये आयटीआय अप्रेंटिस पदाकरिता एकूण 3,508 जागा आहेत . तर नॉन आयटीआय अप्रेंटिस पदांच्या एकूण 1887 जागा आहेत .

पात्रता – आयटीआय व नॉन आयटीआय पदांकरिता उमेदवार हा इयत्ता दहावी मध्ये 50% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर आयटीआय अप्रेंटिस (ITI APPRENTICE ) पदांकरिता उमेदवार हा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

निवड प्रक्रिया : सदर पदांकरिता उमेदवारांच्या इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे , यामध्ये उमेदवार दहावी मध्ये 50 टक्के गुणांपेक्षा कमी गुण असल्यास निवड प्रक्रिया करिता अपात्र ठरणार आहे . परंतु मागासवर्गीय उमेदवारांना गुणांमध्ये पाच टक्के सवलत देण्यात येईल .

या संदर्भातील सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

जाहिरात पाहा

Leave a Comment